
• कारवाई न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचे संकेत.. सुशील कोल्हे बजरंग दल जिल्हा सयोजक
खामगाव:-
दि.०४.०३.२०१५ पासून राज्यात संपुर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागु करण्यांत आला आहे. त्यानुषंगाने गुरांचा बाजारातील दक्षता घेणे आवश्यक आहे असे असताना
दिनांक 7/6/2025 खामगाव येथील मस्तान चौक भागात 12 गौवंश संशयितरित्या कत्तल करण्याच्या हेतूने बांधलेले आढळून आले असता महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार त्या गोवंशांना इयर टॅगिंग केलेले नव्हते तशी सूचना पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे देण्यात आली होती. सूचनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केलेली आहे
सदर 12 गोवंशाच्या खोट्या व बनावट माहिती देऊन विक्रीचे कागदपत्र, पावत्या तयार केलेल्या आहेत.
वास्तविक पाहता इयर टॅगिंग शिवाय कोणतीही गोवंश खरेदी विक्री करता येत नाही असे असताना आरोपी अय्युब कुरेशी रा. शौकत कॉलनी
मोहम्मद अबिद शेख मुनीर रा. मस्तान चौक जमील कुरेशी रा. मस्तान चौक यांनी संगणमत करून खोटे व बनावट माहिती देऊन सदर गोवंशाची हत्या करण्याच्या हेतूने खरेदी विक्री व्यवहार दाखवला असून सदर आरोपींवर महाराष्ट्र गौवंश हत्याबंदी कायदा व भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अशी तक्रार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून कृषि उत्पन्न बाजार समिती, आवारामध्ये शेतक-यांनी आपले जनावरे विक्री करिता बाजार आवारामध्ये आणत असताना सरपंच देत असलेल्या पत्राला अवैध ठरवण्यात यावे त्याजागी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे पत्र ग्राह्य पकडण्यात यावे तशी सूचना बाजार आवरात लावण्यात यावी.
जेणेकरून शेतकऱ्याची होणारी गैर सोय टाळावी, तसेच एक परिपत्रक काढून किंवा डिजिटल बॅनर द्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व लोकांना माहिती व्हावी याकरता लावावी व प्रेस नोट प्रकाशित करावी बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना पिण्याचा पाण्याची तसेच जनावरांकरिता चारा पाण्याची सोय व्हावी, सर्व जनावरांची इयर टॅगिंग असावी त्याशिवाय खरेदी विक्री होऊ नये, पावती देत असताना गौवंशाचे अवलोकन करून पावती देण्यात यावी न पाहता पावती देता कामा नये अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर, विहिंप पूर्व प्रांत सह मंत्री अमोल अंधारे, जिल्हा मंत्री राजेंद्रसिह राजपूत, बजरंग दल विभाग सयोजक गजानन धोरण, जिल्हा सयोजक सुशील कोल्हे, सह सयोजक पवन माळवंदे, कोषध्यक्ष अमोल जोशी, उपाध्यक्ष कृष्णा तायडे, जिल्हा सहसंयोजक भारत बावस्कर, नंदू दलाल तसेच शुभम ढगे, अवी बोपले, विशाल इंगळे, ज्ञानू काराळे, सचिन हागे, अविनाश इंगळे, ज्ञानेश्वर शेगोकार, अतुल ठोंबरे
यांची उपस्थिती होती.













