

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
शासनाने बंदी घातलेला गुटखा जळगाव जामोद परिसरात सर्व लहान मोठ्या दुकानात सहज उपलब्ध असल्याची सूत्रांची माहिती आहे तसेंच सर्रास खुलेआम विक्री सुद्धा केल्या जात आहे, मोठे गुटखा व्यापारी हे आणतात मात्र त्यांचे एजंट फेरीवाले हे प्रत्यक्ष सर्व लहान मोठ्या दुकानात हा अवैध गुटखा पोहचवण्याचे कार्य करत असतात त्याबाबत त्यांना विचारणा केली असता “हमारा कोई कुछ नही बिघाड सकता उपर से लेकर नीचे तक सब को खिलाते है हम” अश्या प्रकारची माजोरी भाषा वापरतात ह्या मुळे स्थानिक पोलिसांवर प्रश्न उपस्थित होतो त्याच प्रमाणे तालुक्यातील असलगाव मध्ये पण सर्रास बंदी असलेला अवैध गुटखा 4 ते 5 लोकांच्या मदतीने साठवल्या व सर्वत्र पुरवल्या जातो येथे सुद्धा सुनगाव सारखी कारवाई व्हावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहे ह्या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेंच अन्न व औषध प्रशासन हे ही सुस्तवलेल्या अवस्तेत असल्याचे चित्र दिसत आहे यांच्या वरिष्ठा नी ह्या कडे लक्ष द्यावे लोकप्रतिनिधी ह्या कडे लक्ष देतील का? असा सवाल सामान्य नागरिक आज विचारत आहे












