वडशिंगी येथे कृषीकन्यांनी घेतले पशु रोगनिदान व लसीकरण शिबिर

0
95

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

येथील पशु चिकित्सालय कृषी विज्ञान केंद्र आणि इंगळे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वडशिंगी येथे गुरांचे लंपीचे लसीकरण ,वंधत्व निवारण, जंत निर्मूलन शिबिर नुकतेच पार पडले .
या शिबिरात शेतकऱ्यांना गुरांच्या लंपी व एकटांग्या या आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले गावातील पशुंवर जत निर्मूलन गर्भ तपासणी वंदत्व निवारण तपासणी व लंपी लसीकरण करण्यात आले पशु आरोग्य विमा योजनेबाबतही ग्रामस्थांना व उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली
या शिबिरात सदानंद,उमरकर शेख रफिक ,बळीराम दाते,श्रीकृष्ण मानकर या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेतले
या शिबिरासाठी आयुक्त डॉ. तडोकार (पशुधन विकास अधिकारी) डॉ.श्वेता मोरखडे (तालुका पशु चिकित्सक), डॉ सोमेश गायकवाड, डॉ गणेश खूपसे, यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले व आकाश तायडे, ओम फुसे, मुकेश पवार, भीमराव गव्हांदे यांनी पशु सेवक म्हणून आपले योगदान दिले

हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई,कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रमोद ढवळे व विषय तज्ञ प्रा.नम्रता खीरोडकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले

शिबिराला गावच्या सरपंच सौ. शितल वानखडे व पोलीस पाटील अनंता ठाकरे इत्यादी उपस्थित होते कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा इंगळे, प्रियंका दाभाडे, संगीता मिसाळ, ममता घुले , खुशी गौर ,विशाखा बोरसे, प्रणाली इंगळे, निकिता खांबलकर, मेघा थारकर, अपूर्वा बोडखे यांनी हे शिबिर पार पाडले.

————————————————————
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ श्वेता मोरखडे व कृषिकन्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here