शिवसेना (उ बा ठा )जिल्हाप्रमुखपदी गजानन वाघ तर, तालुका प्रमुखपदी संतोष दांडगे

0
126

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

शिवसेनेच्या निर्मितीपासून तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असलेले तसेच मधला काही काळ मनसे मध्ये गेला त्यानंतर पुन्हा सेनेत त्यांना तालुका प्रमुख म्हणून पद मिळाले असे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान तालुका प्रमुख गजानन वाघ यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तालुका प्रमुख पदी संतोष दांडगे यांची नियुक्ती झाली असून ते सुद्धा मध्यंतरी भाजपा मध्ये गेले होते व पुन्हा एकदा आपल्या पक्षात म्हणजे स्वगृही परत आले तर जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून दत्ता पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.

गेली ४२ वर्षे पासून गजानन वाघ शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ते नगराध्यक्ष, त्यांच्या पत्नी उपनगराध्यक्ष राहिल्या आहेत आणि कित्येक वर्षापासून ते नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून सुद्धा कार्यरत आहेत.
तर आता शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची महत्वपुर्ण जबाबदारी गजानन वाघ यांच्यावर देण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले दरम्यान पक्षाने दिलेली
जबाबदारी वेळोवेळी निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक पार पाडू व वरिष्ठांचे आदेशाचे पालन करू कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही याची पूर्णता दक्षता घेवू अशी प्रतिक्रिया यावेळी नवनियुक्त जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी पत्रकारांना दिली आहे.
——————————————————-
नवनियुक्त शिव सेना (उ बा ठा )जिल्हा प्रमुख गजानन वाघ व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांचे अभिनंदन करताना शिव सैनिक तथा पदाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here