Home अमरावती युवक नेतृत्वाला नवी दिशा; नितेश वानखडे यांचा बाजार समितीत सत्कार

युवक नेतृत्वाला नवी दिशा; नितेश वानखडे यांचा बाजार समितीत सत्कार

0
31

 

वैशाली नेरकर दर्यापूर प्रतिनिधी

युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी इंजि. नितेश भाऊ वानखडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी वानखडे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपसभापती श्रीकृष्ण पाटील कराळे, संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक गजानन पाटील देवतळे, संचालक साहेबराव भाऊ भदे, संचालक भारत भाऊ आठवले, संचालक राजेश शेठ राठी, संचालक अनिल पाटील भारसाकडे, संचालक राजेश भाऊ खेडकर, संचालक असिफ भाई खान, तसेच प्रदीप बाप्पू देशमुख, दिवाकरराव देशमुख, महेंद्र भाऊ घाटे, अजय भाऊ देशमुख, दिलीप पाटील गावंडे, सपकाळ भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी इंजि. नितेश भाऊ वानखडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!