Home अमरावती दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा ₹५ लाखांपर्यंत वाढविण्याची मागणी

दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा ₹५ लाखांपर्यंत वाढविण्याची मागणी

0
26

 

वैशाली नेरकर दर्यापूर प्रतिनिधी

दर्यापूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांमधील सभासद शेतकऱ्यांना सध्या मिळणारी कर्ज मर्यादा अपुरी ठरत असल्याने ती वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज मा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले.

 

 

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत ₹३,००,००० पर्यंत कर्ज मर्यादा दिली जाते. मात्र, दर्यापूर तालुका हा बहुतांश खारपाण पट्टा असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे बियाणे, खते, औषधे व इतर शेती खर्च भागवण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्याची आवश्यकता भासत आहे. सद्यस्थितीत कर्ज मर्यादा अपुरी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

 

 

यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र सभासद शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा ₹३,००,००० वरून ₹५,००,००० पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळून शेती उत्पादनात वाढ होईल व त्यांच्या आर्थिक स्थैर्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

 

 

हे निवेदन दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अमरावतीचे उपाध्यक्ष श्री. अभिजीत ढेपे, संचालिका सौ. सुरेखाताई ठाकरे व संचालक श्री. अजय मेहकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.

 

 

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार तसेच जिल्हा सरचिटणीस कुलदीप पाटील काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मागणी तात्काळ मान्य करण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!