35 वे माळी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलन शेगाव येथे

0
179

जळगाव जामोद :-प्रतिनिधी
जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात शनिवार दिनांक 14/10/2023 रोजी मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव (जामोद) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सातपुडा कॉपम्स वरवट रोड शेगांव येथे घेण्याचे ठरविले.
मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव (जामोद) यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असते, मंडळाच्या या वर्षीच्या विविध कार्यक्रमासाठी सर्वानुमते अध्यक्ष:- सुनिलभाऊ तायडे(पातुर्डा),
कार्याध्यक्ष:-सुनिल येनकर(आसलगाव), सचिव:- सुरेश वानखडे(बोराळा),. उपाध्यक्ष:-गणेश भड(सूनगांव) आशिष राजनकार(संग्रामपुर) कोषाध्यक्ष:-सारंगधर गोमासे(जळगांव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपवर युवक युवती परिचय सम्मेलन नोंदणीची अंतिम तारीख दि. 10 डिसेंबर 2023 ठरविण्यात आली. सदर बैठकीला
प्रा.हरिभाऊ इंगळे, डॉ.एस.एन.भोपळे,डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर,वासुदेवराव भोपळे,प्रविणभाऊ भोपळे
*महादेवराव घुटे,दशरथ तायडे,रामकृष्ण खिरोडकर विष्णुभाऊ इंगळे, महादेव इंगळे,पांडुरंग वेरूळकार,ऍड.संदीप मानकर,अंबादास उगले,डॉ.संदीप वाकेकर, त्र्यंबकराव घाटे, राजीव घुटे, अँड.रतन इंगळे,गुलाबराव इंगळे, जयदेव वानखडे,आकाश उमाळे,प्रभूदास बोंबटकार,श्रीकृष्ण वानखडे,संजय घाटे,शालीग्राम भोपळे,पांडुरंग भोपळे, विजय म्हसाळ,पंकज तायडे,ग.दि.वानखडे,निळकंठ उमाळे,शांताराम म्हसाळ, नितीन जाधव,अनिल इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते
प्रस्ताविक नितीन सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here