
खामगाव: शतकाची परंपरा असलेल्या शांती महोत्सवास २८ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.स्थानिक जलालपुरा भागात मोठे देवीची विधी व पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली त्याचप्रमाणे शहरात व परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून देखील जगदंबा देवीची स्थापना करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध राज्यातून भाविक खामगाव येथे दर्शनासाठी येत असतात. या उत्सवाचे महत्त्व ११५ वर्षानंतर देखील अबाधित आहे.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता स्थापना करण्यात आली. ६ नोव्हेंबर पर्यंत साजरा होणाऱ्या या उत्सवात ४ नोव्हेंबर रोजी महाप्रसाद वितरीत होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.













