“गुळवेल :मधुमेहावर रामबाण उपाय”

0
96

“गुळवेल :मधुमेहावर रामबाण उपाय”
(भाग १)

सॊजन्य संध्यानंद :- गुळवेल हि एक चमत्कारिक वनस्पती आहे.
जी सर्वप्रकारच्या आजारांवर उत्तम औषध आहे.
गुळवेल हि एक औषधी वनस्पती आहे.
ज्या वनस्पतीला अमृततुल्य वनस्पती असे मानलं जात.
गुळवेल कशाप्रकारे मानवी जीवनातील प्रत्येक आजाराला दूर करते याविषयी जाणून घेऊ.

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आजाराना दूर करणार हे एक उत्तम औषध आहे. गुळवेल कोणत्याही आजाराशी दोन हात करण्याची ताकद रुग्णाला देते. गुळवेल सर्वोत्तम वैशिष्ट म्हणजे ती ज्या झाडावर चढते, त्या झाडाचे गन स्वतः मध्ये सामावून घेते. कडुलिंबावर चढलेली गुळवेल सगळ्यात उत्तम समजली जाते.

ज्वरनाशक गुळवेल :
गुळवेलचा ज्वरनाशक म्हणून वापर उपयुक्त ठरतो . जर एखादी व्यक्ती खूप दिवसापासून कोणत्याही प्रकारच्या तापाने पीडित असेल आणि खूप औषधं घेऊनही अराम पडत नसेल तर अश्या व्यक्तीने गुळवेलीचं सेवन करायला हवे. जर एखाद्या व्यक्तीला डेंगू चा ताप येत असेल तर त्या रुग्णाला डेंगू सक्षमी वटी म्हणजे च गुळवेल धनवटी द्यावी. यामुळे डेंगू च्या तापत आराम पडतो. सक्षमी वटी डेंग्यूच्या तापात सर्वात चांगल औषधं मानलं जातं .

दृष्टी सुधारते :
ज्या व्यक्तीच्या डोळ्याची दृष्टी कमी झालेली आहे. त्यांनी गुळवेलीच्या रसाचं सेवन आवळ्याच्या रसाबरोबर करावं, यामुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. गुळवेल हि एक शामक औषधी आहे. ज्याचा योग्यप्रकारे उपयोग करण्याने शरीरात निर्माण झालेला वात, पित , कफ. आणि त्यासंबंधित आजारापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

पचन राहते सुरळीत :
गुळवेलीच्या रसाचं नियमित सेवन करण्याने पचन यंत्रणा ठीक राहते. पचन यंत्रणा ठीक राहावी यासाठी अर्धा ग्रॅम गुळवेल पावडर आवळ्याच्या चूर्णा बरोबर नियमित सेवन करण्याने फायदा होतो. गुळवेल शरीरातील रक्तातील प्लेटलेजतंतू संख्या वाढवते.

मधुमेहात फायदेशीर :
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे. त्यांनी गुळवेलीच्या रसाचं सेवन करावं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान आहे. अशा व्यक्तींनी करंगळीएवढ्या गुळवेलीच्या खोडच रस आणि बेलाच्या एका पानांबरोबर थोडीशी हळद मिसळून एक चमचा रसाचं सेवन करायला हवं. यामुळे मधुमेहाची समस्या दूर होण्यास मदत होते.

लठ्ठपणा होतो दूर :
लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी गुळवेलीच सेवन करायला हवं. त्यासाठी एक चमचा रसात एक चमचा मध मिसळून सकाळ-संध्याकाळ घेण्याने लठ्ठपणा दूर होतो, याशिवाय जर पोटात जंत झाले असतील आणि जंतामुळे शरीरातील रक्त कमी झालं असेल तर पीडित व्यक्तीने काही दिवसापर्यंत गुळवेलाच सेवन नियमित करायला हवं.

रोगप्रतिकार क्षमता वाढवते :
गुळवेलीत अँटीऍक्सिडंट गुण असतात. जे धोकादायक आजारापासून लढून शरीराला निरोगी ठेवतात गुळवेल किडनी आणि यकृतातील विषारी पदार्थाना बाहेर काढते आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करते नियमित गुळवेलीचा रस पिण्याने आजाराशी लढण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवते.

सर्दी-खोकला होतो दूर :
एखाद्या व्यक्तीला जा सातत्याने सर्दी-खोकल्याची समस्या सतावत असेल तर गुळवेलीच्या रसच करायला हवं दोन चमचा गुळवेलीच्या रसच दररोज सेवन करण्याने खोकल्यापासून मुक्ती मिळते. हा उपाय तोपर्यंत अजमावा, जोपर्यत खोकला पूर्ण बारा होत नाही.
(क्रमशः)

अभि. श्रीकृष्ण लांडे
वनस्पती अभ्यासक
९४२२९४५१८४

 

 

आपल्या शहरातील/तालुक्यातील ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्याकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

1)जळगांव जामोद
https://chat.whatsapp.com/Jdvk9wK6Bun2JFW2yIoirz

2)खामगांव
https://chat.whatsapp.com/Ex9r04DvB50BxLrqKn5DVL

3) संग्रामपूर
https://chat.whatsapp.com/L5xlE8C3NIW1q5Bw153dSc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here