
वाशिम(प्रतिनिधी):- खा. गवळी यांची महावितरण कार्यालयावर धडक
वीज पुरवठ्याबाबच्या समस्या सोडविण्याचे दिले निर्देश
वाशीम ( जि. प्र.) विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून जिल्ह्यातील रब्बी हंगामाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन खा. भावना गवळी यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडत महाविरणच्या कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. रोहित्रे नादुरुस्त होतात.यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीस शेतकरी समस्याग्रस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खा. भावना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी विद्युत भवन, सिव्हील लाईन, वाशिम येथे जिल्हास्तरीय “वर्ष 2023-24 रब्बी हंगामपूर्व नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या सभेत रब्बी हंगामाकरिता नियमित वीज पुरवठा निर्देश देण्यात आले. तसेच रब्बी हंगामाच्या कालावधीत कृषी वाहिनीचा वीज पुरवठा सुस्थितीत ठेवण्यात यावा. रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याचा अहवाल त्याच दिवशी संबंधित कार्यालयात सादर करावा.
दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पर्यंत प्









