
वाशिम(जि.प्र.) राज्यात महिला असुरक्षीत, कायदा व सुव्यवस्था धोक्या
सुषमा अंधारे : पत्रकार परिषदेत आरोप
वाशीम ब्युरो. भाजप हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते. भाजपच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यातील महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुलींवर 2022 पासून अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. असे असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या गृहखात्याचा वापर हा केवळ शिवसेना फोडण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांवर कारवाई करण्यासाठी वापर करीत आहेत. तर, भाजपचे हिंदूत्वही बेगडी असून भाजपच्या या राज्यात महिला असुरक्षीत आहेत. असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या महाप्रबोधन यात्रा समारोपानिमित्त वाशीम येथे आल्या असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पत्रकार परिषदेला जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव, जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर, जिल्हा संघटक सुरेश मापारी, महिला आघाडी समन्वयक मंगलाताई सरनाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना सुषमा अंधारे यांनी स्थानिक प्रश्नासोबतच राज्य व देशातील गंभीर प्रश्नांना वाचा फोडली. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की,भाजपने सुडभावनेतून शिवसैनिकांवर कारवाई करून सत्ता हस्तगत केली आहे महत्वाचे खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवून गृहखात्याचा वापर हा शिवसैनिकांवर कारवाई करण्यासाठी केला आहे त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात महिलांवर त्याचबरोबर निरागस खेळण्याबागडर्या मुलींवर अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भाजपच्याराज्यात महिला असुरक्षीत झाल्या आहेत आणि भाजपच्या महिला पदाधिकारी ह्या भाजप ची पाठराखण करण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा मुलमंत्र देत आहेत. केवळ 5 ते 7 वर्षाच्या मुली कशा आत्मनिर्भर होतील हा प्रश्न असून भाजपच्या महिला पदाधिकार्यांची किव यावी अशा त्या बोलत आहेत. भाजपचे हिंदूत्व हे बेगडी असून देवेंद्र फडणवीस हे कायदा व सुव्यवस्था ठेवण्यास नापास झाले आहेत.कारागृहातून कुख्यात गुंड फरार होत आहे. कैद्यांना पॅकेट देताना पोलिसांचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. महिला असुरक्षीत आहेत. शाळकरी मुलींना शिक्षण घेणे कठीण झाले आहे.गृहखात्याचा वचक राहिलेला नाही. कारागृह हे कैद्यांसाठी नंदनवन झाले आहे. भाजपच्या विरोधात आवाज उठविला तर, खोट्या केसेस टाकण्याची धमकी दिली जाते. तर, उठसुट कोणावरही आरोप करण्याची किरीट सोमय्या यांना अधिकार देण्यात आला आहे. असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. भाजपच्या काळात जिल्ह्यावर सतत अन्याय झाला आहे. सोयाबीनला भाव नाही, आता तूर शेताबाहेर येण्याचे दिवस आले असताना भाजप सरकारने तूर आयात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शेतकर्यांवर पुन्हा अन्याय होणार आहे. वीज देयक भरण्यासाठी शेतकर्यांच्या मागे तगादा लावला जात आहे तर, सिंचनासाठी वीज नाही, राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकरी पूत्र असल्याचे सांगतात मात्र, प्रत्यक्षात शेतकर्यांचे काय हाल आहेत. याकडे त्यांचे लक्ष नसून मुख्यमंत्र्यांना कोणतेही सोयरसूतक नसल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.
बॉक्स
वाशीमचा विकासात पालकमंत्र्याचा अडसर
जिल्ह्याच्या विकासाचे धोरण डीपीडीसीच्या बैठकीत ठरते़ परंतू गेल्या दोन वर्षात केवळ एक बैठक घेण्यात आली़ त्यातही ठोस निर्णय घेतल्या गेले नसल्याने जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री संजय राठोड व शिंदे व भाजपच्या सरकारला काही देणे नसल्याचे दिसून येते़ त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खिळ घालण्यात पालकमंत्री संजय राठोड यांची भुमिका असून विकासात पालकमंत्री प्रमुख अडसर असल्याचा आरोप त्यांनी केला़ तसेच पालकमंत्री संजय राठोड, अब्दुल सत्तार यांचा वाशीम जिल्ह्यातील जमिन घोटाळा, शहरातील विकास कामे, स्थलांतरीत करण्यात आलेल्या जलसंधारण कार्यालय तसेच शेतमालाच्या भावासाठी शिवसेना आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून प्रसंगी याप्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला़









