अवैध वरलीवर रेड आरोपीसह मुद्देमाल जप्त

0
92

 

नांदुरा(प्रतिनिधी):-

नांदुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निमगाव तालुका नांदुरा येथील अवैध वरलीवर रेड केली असता आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 /1/ 24 रोजी पोलीस स्टेशन नांदुराचे ठाणेदार विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस नाईक राहुल ससाने पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोजने हे ग्राम निमगाव मध्ये प्रोव्हिशन व जुगार रेड  कामी पेट्रोलिंग करत असताना.

त्यांना गुप्त खबरे कडून माहिती मिळाली की ग्रामपंचायत निंमगावचे कॉम्प्लेक्स समोर सार्वजनिक ठिकाणी आरोपी नामे गणेश चंद्रभान महाले वय 34 वर्षे राहणार .रामपूर तालुका नांदुरा हा वरली मटका जुगार खेळताना व खेळवीताना मिळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत रेड  केला असता त्याच्या कब्जातुन 1330/ रुपये व एक वालपेपर किंमत 5 रुपये असा एकूण 1335/ रुपयाचा जुगार मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

असुन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदूर येथे अपराध क्रमांक 52/2024 कलम 12 मजूका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here