
जळगाव जामोद (प्रतिनिधी) :-
घोड्यावर मिरवणुक काढत ग्रामस्थांनी केले रविकांत तुपकरांचे जंगी स्वागत
दिनांक १ फेब्रुवारी ला मौजे सातळी येथे शेतकरी-कष्टकरी-मजुर व तरुणांचा भव्य असा एल्गार मेळावा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता.
या मेळाव्यामध्ये सोयाबीन-कापसाची दरवाढ झाली पाहिजेत २२ जुलैला जी ढगफुटी झाली त्या ढगफुटी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे व इतर काही मागण्या घेऊन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्या अगोदर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ग्रामस्थांनी घोड्यावर बसून त्यांची पुर्ण सातळी गावातुन जंगी अशी मिरवणूक काढली आणि त्यांनतर मेळाव्याला सुरूवात केली. या मेळाव्याला ग्रामस्थांनी व परीसरातील लोकांनी प्रचंड अशी उपस्थित दाखवली.













