
जळगाव जामोद प्रतिनिधी
अमोल भगत
तालुक्यातील, जामोद येथील शेतकऱ्यांनी कावेरी कंपनीचे कावेरी 50 या वाणाची लागवड केली होती. परंतु पंधरा दिवस उलटूनही हे बियाणे उगवलेच नाही, संबंधित सर्व कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांनी तक्रार केली असता सदर कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात पाहणी करून गेल्यानंतर, एक आठवडा उलटून गेल्यावरही कुठल्याच प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यामुळे वैतागून अखेर सर्व शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे धाव घेत तक्रार अर्ज देत, सदर बाबीची तातडीने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून शहानिशा करून संबंधित विक्रेत्यावर तसेच संबंधित कंपनीवर तात्काळ कार्यवाही करावी व आमच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ आम्हाला द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी सात दिवसानंतर कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करून संबंधित कंपनीची तक्रार ग्राहक मंचामध्ये करू असे सांगितले.













