
जळगांव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
येथील पशु चिकित्सलाय, कृषी विज्ञान केंद्र आणि इंगळे कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील उटी येथे गुराचे लसीकरण, वंद्धत्व निराकारण व जंत निर्मूलन शिबीर नुकतेच पार पडले.
या शिबिरात शेतकऱ्यांना गुराच्या घटसर्प आणि एकटाग्या या गुराच्या आजारा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावातील पशुवर जंत निर्मूलन, गर्भ तपासणी वंद्धत्व निवारण तपासणी व घटसर्प लसीकरण करण्यात आले. पशु आरोग्य विमा योजनेबतीत ग्रामस्थांना व उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या शिबिरासाठी आयुक्त डॉ. श्वेता मोरखडे (तालुका पशु चिकित्सक ) यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले तसेंच सहाय्यक म्हणून शिरसाट व गावंडे यांनी पशुसेवक म्हणून आपले योगदान दिले.
शिबीर यशस्वीतेसाठी प्रचार्य योगेश गवई, प्रा नम्रता खिरोडकर, प्रा अविनाश आटोळे आणि प्रा प्रमोद डव्हळे यांनी मार्गदर्शन केले या आयोजित शिबिरात पोलीस पाटील भाऊराव उमाळे, ग्रामस्थ म्हणून देविदास उमाळे, पंजाबराव उमाळे, संतोष उमाळे, हे उपस्थित होते तर उपस्थित कृषि महाविद्यालयातील विधी इंगळे, नेहा ढोले, प्रणाली कोकाटे, प्राची पळसपगार, साक्षी गणेशपुरे, रुचिका रामरोहीया, प्रेरणा अमृतकर, कांचन कवळे, आणि वैष्णवी राऊत ह्या विद्यार्थिनी नी हे शिबीर यशस्वीपणे राबविले.













