सातपुडा शिक्षण संस्थेमध्ये पानी फाऊंडेशन तर्फे कॅम्पस द्वारे मुलाखतीचे आयोजन

0
123

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद, जिल्हा: बुलढाणा द्वारे संचालित तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (महाराष्ट्र राज्य) संलग्नित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद येथे पानी फाउंडेशनतर्फे गटशेती ही संकल्पना राबविण्यासाठी तालुका स्तरावर “कृषि प्रशिक्षक” या पदाकरीता कॅम्पस मुलाखतीचे दि.28/12/2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये एकूण 55 कृषि व कृषि संलग्न पदवीधारक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पदवीधारक विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी पानी फाऊंडेशन तर्फे मुलाखत पॅनेल सदस्य म्हणून श्री.रविंद्र पोमने (प्रशिक्षक), श्री.सुखदेव भोसले (विभागीय समन्वयक) तसेच श्री.ब्रम्हदेव गिऱ्हे (तालुका समन्वयक) श्री.निलेश बढे (तालुका समन्वयक), श्री.तृपाल तायवाडे (तालुका समन्वयक) आणि श्री.तुषार राऊत (तांत्रिक प्रशिक्षक) उपस्थित होते.

मुलाखती अगोदर श्री.रविंद्र पोमने यांनी पानी फाऊंडेशन अंतर्गत गटशेती व पानी व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली सोबतच गटशेती या संकल्पने वर आधारित चित्रफीत सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दाखविली. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शेती व पानी याचे महत्त्व पटवून दिले आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरीता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सतिश धर्माळ, कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.शामदास बैरागी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.अविनाश आटोळे आणि प्रा.अमोल चोपडे तसेच प्रा.कु.खिरोडकर, प्रा.प्रितेश वानखडे, प्रा.सचिन शिंगणे आणि प्रा.दत्ता तायडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here