कृषी कन्यांनी दाखवला शेतकऱ्यांना झिरो एनर्जी कुल चेंबरचा मार्ग

0
92

कृषी कन्यांनी दाखवला शेतकऱ्यांना झिरो एनर्जी कुल चेंबरचा मार्ग

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

 

येथील कृषी महाविद्यालय तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उटी गावात कृषी कन्यांनी झिरो एनर्जी कूल चेंबर तयार करून प्रात्यक्षिक दाखवले. या प्रात्याक्षीका दरम्यान कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की झिरो एनर्जी कूल चेंबर ही एक पर्यावरण पूरक आणि स्वस्त साठवण पद्धत आहे जी विशेषतः शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. हे चेंबर फळे,भाज्या आणि इतर ताज्या वस्तूंची साठवण व संरक्षकता सुनिश्चित करते, ज्यामुळे त्यांची ताजगी आणि गुणवत्ता अधिक काळ टिकून राहते. ही साठवण प्रक्रिया अतिशय स्वस्त असून यासाठी लागणारे साहित्य जसे की विटा, रेती, पाणी, क्रेट आणि गोणपाट सहज उपलब्ध होतात. हे प्रात्यक्षिक प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, प्रा. विद्या कपले आणि प्रा. अमोल चोपडे यांच्या देखरेखीखाली पार पडले. प्रात्यक्षिक सुरू असताना प्रा.विद्या कपले , प्रा. नम्रता खिरोडकार तसेच कृषी कन्या प्रियंका हिस्सल, पूर्वा डोबे, प्राजक्ता इंगळे, ऋतुजा पाटील, कल्याणी खारोडे, प्रीती डवले, वैष्णवी घोगरे, सानिका गोंडचोर, प्राची खडीशंकर, श्रुती गावंडे, कोमल धोरण, दुर्गा निंबोळकर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकाचा उद्देश शेतकऱ्यांना झिरो एनर्जी कूल चेंबर बनवण्याची व त्याच्या फायद्या सहित माहिती देणे आणि त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here