
कृषी दुतांनी पटवून दिले माती परीक्षणाचे महत्त्व
जळगाव (जा) : प्रतिनिधी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्व.वि.ग.ई.कृषी महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी निबोरा येथे ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतात जाऊन शेतकऱ्यांशी
संवाद साधुन शेतक-यांना माती परिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
माती परिक्षणामुळे पिकांना लागणारी खताची मात्रा ठरवता येते व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण करता
येते. तसेच माती परिक्षणामुळेमाती मध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे याबद्दल माहिती मिळते.
माती परिक्षण करुन त्यानुसार केलेल्या पिक लागवडीमुळे भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवता येते. माती परीक्षण
केल्याने शेताच्या मातीत कोणत्या पीक पोषक तत्त्वाची कित्ती मात्रां आहे हे कळते व त्यानुसार खते व इतर पोषक
द्रव्यांची उपाययोजना करता येते.
सदर कार्यक्रम घेण्यात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई , कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश
आटोळे , समन्वयक प्रा. वि द्या कपले , प्रा. समाधान काळे यांचेसहकार्य लाभले. या कार्यक्रमाला
कृषि दूत मकरंद बोचरे,
प्रज्वल जुमळे,सकंल्प राऊत,
धिरज मोरे, प्रणित वाघ, गणेश बाठे व संलग्नित शेतकरी उपस्थित होते.













