खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षपदी विठ्ठल वाघ यांची अविरोध निवड.

0
40

 

जळगाव जामोद प्रतिनिधी

आज दिनांक 17/01/2025 रोजी शेतकी खरेदी विक्री संस्थेची अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यामध्ये विठ्ठल तुकाराम वाघ उर्फ बंडू पाटिल काजेगाव यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. महेश कृपलानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव जा. हे होते.
2023 मध्ये संस्थेची निवडणुक पार पडली यानंतर सहकार नेते प्रसेनजीत पाटिल यांच्या पैनलचे अजहर पटेल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. डिसेंबर मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज 17/01/2025 रोजी अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यावेळी प्रसेनजीत पाटिल यांचे निकटवर्तीय विठ्ठल वाघ यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष यांचा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटिल, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ, कॉंग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष बालगजानन पाटिल, वंचित आघाड़ीचे नेते अरुण पारवे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, सुनिल बोदडे, रमेश ताडे, पराग अवचार, प्रमोद सपकाळ, प्रशांत अवसरमोल, राजेंद्र देशमुख, बाळू पाटिल डिवरे, अशोक गवळी, देविदास पारस्कर, मनोहर वाघ, सुभाष कोकाटे, विजय ठाकरे, विलास अवचार, मधुकर कवले, गुनवंत वाघ, विजय काळे, प्रकाश गावंडे, मंगल डोंगरदिवे, विष्णु आटोळे, सुभाष पाटिल,ईरफान खान,आशिष वायझोडे मोहसिन खान, संजय ढगे, सोपान आटोळे,डिगाबर तिजारे, शरद कोकाटे, दादाराव धंदर, बाळू पाटिल सुलताने, सिद्धार्थ हेलोड़े, गजानन भालतडक यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मोठ्या संखेने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here