जळगाव जामोद परिसरात गोवंशाची चोरी

0
221

जळगाव जामोद मधील सावरकर नगर बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी येथील रहिवाशी शेतकरी सुरेश राजपूत यांनी नेहमी प्रमाणे गुरे गोठ्यात बांधले होते. सकाळी त्यांना त्याची एक गाय निदर्शनास न आल्याने त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना त्यांची गाय मिळाली नाही. मग त्यांनी सी. सी. टीव्ही फुटेज बघितल्यास पांढऱ्या रंगाची इर्टिका गाडी मध्ये अज्ञात चोरटयांनी १७/१०/२०२३ रोजी रात्री २ च्या सुमारास गाय चोरून नेताना आढळून आले. परिसरातील शेतकरी व गोवंश पालक यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नागरिकांना असे संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्यांची विचारपूस करावी व पोलिसांना माहिती द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here