
संग्रामपूर: कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आत्मक्लेश आदोलनांचा इशारा दिला आहे.
यावर्षी मागील वर्षा प्रमाणे कमी-जास्त पाऊस पडल्याने कापूस-सोयाबीनचे उत्पादन कमी आहे. सरकारने या शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पडल्याने शेतकऱ्याची कोंडी झाली आहे. मागील वर्षीची रोखलेली अतिवृष्टीची मदत चालू वर्षाचा अग्रीम विमा रक्कम २२ जुलैच्या अतिवृष्टीचे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याचे खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला अशा मुद्यावर लक्ष वेधले स्वाभिमानी शेतकरी संघटने चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, विजय ठाकरे, शंकर ससाणे, गोकुळ गावंडे, महंमद शहा, धनंजय कोरडे, प्रवीण पोफळणारे, शैलेश उमाळे, मुकुंदा विखे, वैभव ठाकरे, अभिषेक ठाकरे, रोशन देशमुख, यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.