जळगांव जामोद येथे..दुर्गा देवी विसर्जन शांततेत संपन्न..

0
234

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद येथे, ह्यावर्षी नवरात्रोत्सवात 15 मंडळांनी देवीच्या विविध रुपाची स्थापना मोठ्याप्रमानात साजशृंगारासह केली होती.नऊ दिवसात भक्तांनी देवीची पूजा, आरत्या, उपासना, होमहवन अश्या विविध गोष्टी मनोभावे करत, नऊ दिवसानंतर मंडळांनी स्थापन केलेल्या देवीच्या विविध रूपांची संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढत ..देवीला फुल हारांनी सजविलेल्या वाहनावर बसवून विद्युत रोषणाई करून लेझीम पथकासह..बँड..ढोल..ताष्याच्या गजरात तसेच डीजे च्या गाण्यांवर ताल धरत मोठ्या भक्ती-भावाणे तल्लीन होऊन नृत्य करत, देवीला निरोप दिला. यावेळी माळीखेल मधील धर्मशक्ती दुर्गा उत्सव मंडळासमोर..कर्नाटक राज्यातील कांतारा ह्या चित्रपटातील पंजुली देवाच्या भूमिकेतील एक व्यक्ती लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता..अशाप्रकारे देवीची विसर्जन शोभायात्रा संपन्न झाली..संपूर्ण तालुक्यातील भक्तांची मोठ्याप्रमाणात यावेळी उपस्थिती होते .कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here