आरोग्यसेवेचा हा सेवायज्ञ अव्याहतपणे संस्थेद्वारा चालू असेल – मा. आमदार डॉ संजय कुटे
जळगाव जामोद:-प्रतिनिधी
येथील सांस्कृतिक भवनात कुपोषित बालक तपासणी शिबीर संपन्न झाले.
शिबिरात जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील 184 कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शेगाव 57, संग्रामपूर 60 तर जळगाव जामोद येथील 65 बालके तपासण्यात आली.
शिबिरासाठी अकोला, खामगाव, शेगाव येथील बालरोग तज्ञांनी दिली सेवा
डॉ एस. एस. काळे अकोला, डॉ गुरुप्रसाद थेटे खामगाव, डॉ अमोल नाफडे शेगाव,डॉ मयूर वाडे शेगाव, डॉ कमलकिशोर ढोले अकोला, डॉ विकास चरखे खामगाव या बालरोग तज्ञांनी शिबिरात आरोग्य तपासणी केली.
तसेच डॉ निलेश टापरे वैद्यकीय अधीक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती…
शिबीर समन्वयक म्हणून डॉ जीवन भारती यांनी सेवा दिली.
तर श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ काळपांडे यांनी संस्थेची उद्धीष्टे व कुपोषणाबद्दल मार्गदर्शन केले
विशेष पोषण आहार वाटप
कुपोषित बालकांमध्ये विविध सूक्ष्मद्रव्य, जीवनसत्वे, क्षार याची कमतरता कुपोषणामुळे असते. अश्या परिस्थितीत शेंगदाणे दूधपावडर पिठी साखर युक्त आहार संस्थे द्वारा देण्यात येतो. या आहारात आवश्यक अशी सूक्ष्मद्रव्य, जीवनसत्वे, क्षार असतात जी बालकांना कुपोषणातून बाहेर आणण्यासाठी मदत करतात.
हा आहार मा. आमदार यांच्या घरीच गुणवत्तापूर्ण पद्धतीने बनविण्यात येतो ही बाब उल्लेखनीय आहे.
हा आहार राजमाता जिजाऊ पोषण मिशन महाराष्ट्र राज्य द्वारे प्रमाणित आहे.
कुपोषित बालक तपासणी शिबीर उद्धेश
श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन द्वारे
चालविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमा पैकी हा एक महत्वाचा उपक्रम आहे. सातपुड्यातील आदिवासी दुर्गम भाग पाहता या भागात कुपोषणाचे प्रमाण विविध कारणांनी अधिक आढळून येते, कुपोषणामुळे बालका ची शारीरिक वाढ व बौद्धिक वाढ खुंटते, वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, बाल मृत्य चे प्रमाण वाढते
म्हणून भावी सशक्त नागरिक व परिणामी सशक्त राष्ट्र करण्याच्या दृष्टीने बालकांना कुपोषणातून बाहेर काढणे हे संस्थेचे उद्धीष्ट आहे. कुपोषण मुक्त मतदारसंघ या ध्यासाने संस्था अखंड कार्यरत आहे.
कुपोषण बाबत जनजागृती करणे
श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन द्वारे कुपोषित बालक असणाऱ्या गावातील स्वयंसेवक तथा कार्यकर्ते उदात्त भावनेने त्या बालक चा आरोग्यविषयक पाठपुरावा करतात,
या स्वयंसेवकांना व कुपोषित बालका च्या मातांना प्रत्येक शिबिरात कुपोषण विषयी माहिती
तज्ञ द्वारे दिली जाते जेणेकरून माता व स्वयंसेवक कुपोषण बद्दल योग्य त्या उपाययोजना घरी सुद्धा भविष्यात करू शकतील…