मतदारसंघातील अनाथ बालकांसोबत आमदार डॉ.कुटे यांनी परिवारासह
साजरी केली दिवाळी…
श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशन तर्फे 1000 पेक्षा जास्त मुलांना फराळ व कपडे वाटप
जळगाव जामोद:-प्रतिनिधी
मतदारसंघातील जवळपास 1000 च्या वर अनाथ बालकांसोबत लाडनापूर येथील जगदंबा संस्थान मंदिरामध्ये आ.डॉ.संजय कुटे यांनी आपल्या परिवारासह त्याठिकाणी जाऊन यंदाची दिवाळी त्या मुलांना नविन कपडे व फराळ वाटप करून साजरी केली. संग्रामपूर जळगाव जामोद व शेगाव या तिन्ही तालुक्यातील १००० च्या जवळपास अनाथ बालकांची नोंद श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनकडे होती त्यामुळे त्यांची दिवाळी सुद्धा प्रकाशमय व्हावी या उदात्त हेतुने या फाउंडेशनद्वारे हा अभिनव उपक्रम यावेळी राबविण्यात आला होता. अनाथ बालके व त्यांना संविधानाने दिलेले हक्क तसेच मातृ व पितृ छत्र हरविल्याने या अनाथ बालकांचा समाजामध्ये जगण्याचा अधिकार या हृदयस्पर्शी विषयावर उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली करत असलेल्या डॉ.कुटे यांच्या वहिनी सौ. पूजा राजेंद्र कुटे यांनी भावस्पर्शी संबोधन उपस्थित अनाथ बालकांसमोर केले.मतदारसंघातील अनाथ बालकांसमवेत आज दिवाळी हा सण साजरा केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.संजय कुटे यांनी यावेळी केले. यापुढे बोलताना समोर उपस्थित बालकांपैकी कोणत्याही गरजू बालकाला त्याचे शिक्षणाकरिता व सामाजिक अडचणीकरिता मदत करण्यासाठी माझ्या घराचे दरवाजे २४ तास उघडे असून या बालकांच्या उच्चाटनासाठी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे गावागावातील कार्यकर्ते निस्वार्थपणे कार्य करीत आहेत याबद्दल त्यांचे आभार मानले, सोबतच सेवेचा हा महायज्ञ अखंड तेवत ठेवण्याचा निश्चय बोलून दाखवला.जगदंबा माता मंदिर लाडणापूर येथे आयोजित ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रमेश काळपांडे ह्यांनी कार्यक्रमाचे केले, तर डॉ.कुटे ह्यांनी यावेळी ह्या कार्यक्रमाचे मुख्य संकल्पक मुरलीधर काका जामोदे ह्यांचा सपत्नीक सत्कार केला तर आ.कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे यांचा सत्कार यावेळी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनतर्फे करण्यात आला.याप्रसंगी कुटे परिवारातील सौ.पूजा राजेंद्र कुटे, सौ.अपर्णा संजय कुटे, सौ.मीनल कुटे, राजेंद्र कुटे, प्रमोद कुटे, अभिषेक कुटे, ओम कुटे, यश कुटे यांचेसह शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने तसेच कुटे गुरुजी फाऊंडेशनचे संचालक गजानन सरोदे , पांडुरंग इंगळे. राजेश अग्रवाल, गोटेचा सर, डॉ नंदूभाऊ तायडे, मानसकर सर, रवी पाचपोर, प्रकाश राऊत पंजाब ठाकरे, संजय बोरसे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ.गणेश दातीर यांनी केले कार्यक्रमासाठी विजय हागे, अरुण कराळे, परिक्षित ठाकरे, दिगंबर हिवरकर आनंद वानखडे, उमेश येउल, रामेश्वर इंगळे यांनी तसेच लांडणापुर येथील स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.