जळगाव जामोद:- प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती 2022-23 च्या परीक्षेत वाणिज्य व कला शाखेतून विविध विषयांमध्ये महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसं वितरीत करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे हे होते तर प्रमुख पाहुणे वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश नेवे होते. तथा जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वल करून समारंभाची सुरुवात केली. मान्यवरांच्या स्वागतानंतर कु. निकिता घुळे या विद्यार्थ्याने उत्कृष्ट स्वागत गीत सादर केले. संस्कृतिक कार्यक्रम समन्वय प्राध्यापक गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती 2022- 23 च्या परीक्षेत वाणिज्य व कला शाखेतून विविध विषयांमध्ये महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसं वितरीत करण्यात आले . यामध्ये कु. चैताली कुटे, किरण कवळकर , निकिता सोनवणे, सरिता धामोळे, राधा ठाकरे, वैष्णवी सुरपाटणे, वैष्णवी धर्मे, वैष्णवी भोपळे, रोशनी वावगे,आरती दामधर, लिलू मोरे ,अंकिता फुसे, काजल घाटे, सपना भालतडक, किर्ती दाभाडे, वैष्णवी भोपळे वैष्णवी,वैष्णवी तायडे या विद्यार्थिनीना बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक बक्षीसे कु. चैताली कुटे या विद्यार्थिनीने पटकावले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सतीश नेवे यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून एक चित्ताने अभ्यास करवा व यश संपादन करावे तसेच आयुष्यात उच्च उद्दिष्ट ठेवावे या आशयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंद जोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले. विद्यापीठ परीक्षा 2022- 23 बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन प्रा. सिद्धार्थ इंगळे, व प्रा. विनोद बावस्कर यांनी केले. याच कार्यक्रमात शैक्षणिक सत्र 2023- 24 मधील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वक्तृत्व, स्पर्धा, एकल अभिनय, नाटिका, नृत्य,रांगोळी, निबंध यासारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक कलाकृतींमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचे संचालन प्रा. प्रदीप चव्हाण यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक आकाश निलजे यांनी केले.या बक्षिस वितरण समारंभासाठी प्रा. मायी, प्रा. बावस्कर, प्रा. चव्हाण, प्रा.निंबाळकर, प्रा. जोशी , प्रा. भोपळे यांच्यासह सर्व प्राध्यापकांसह,अधिक्षक संजय गाडेकर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.