जळगावात भव्य संविधान आक्रोश मोर्चा… संविधान प्रतिकृती विटंबना व सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा मोर्चाद्वारे मागणी…

0
41

 

जळगाव जामोद प्रतिनिधी-अमोल भगत

जळगाव जामोद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा दिनांक ०६ जानेवारी रोजी काढण्यात आला..या आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बहुजन समाजातील महिला पुरुष तरुण नवयुवक, युवती यांचेसह समता सैनिक दलाचे जवान व जळगाव जामोद तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित होते. हा मोर्चा स्थानिक भीम नगर येथुन निघाला त्यानंतर चावडी येथून स्थानिक दुर्गा चौक तहसील चौक व नंतर आंबेडकर चौक येथे मोठ्या जाहीर सभेनंतर संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना परभणी संविधान प्रतिकृती विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी व मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेच्या निषेधार्थ व त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीस सरकारी सेवेत सामावुन घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करावी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांना निवेदन देत जाहीर निषेध केला. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यासह भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी यांचे सह तालुक्यातील बौद्ध उपासक, उपासिका,तरुण युवक, युवती, बहुजन समाजातील महिला पुरुष तसेच संविधान प्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here