

गुटखा तस्करी भाग 1
जळगाव जामोद -प्रतिनिधी
अमोल भगत
महाराष्ट्र – मध्यप्रदेश सिमेवर सातपुडा पर्वत आहे. या पर्वतिय क्षेत्रातून जळगाव जामोदवरून पास होतांना
इथे 2 चौक्या आहे 1 वन विभाग तर दुसरी पोलीस स्टेशन ची तरी सुध्या दिवसा ढवळ्या ही गुटकाची अवैध
तस्करी सुरू आहे ह्यात स्थानिक पोलिस काहीच कार्यवाही करत का नाही
“अशी नागरिकात चर्चा आहे
त्यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी स्थानिक पोलिस काहीच कार्यवाही करतांना दिसत नाही
महाराष्ट्रात गुटखा बंदी कायदा असल्यावर सुध्या कोटीचा गुटखा मध्य प्रदेशातून दिवसा ढवळ्या पोलिस अधिकारी हजर असताना त्याच्या समोर ह्या गाड्या पास होतांना दिसून येतात
हे तस्कर टूनकी, तालुका संग्रामपूरव अन्य तालुका खामगांव नांदुरा येथिल काही रहिवाशी आहेत
ह्याचा माल संपुर्ण जिल्हा भर ह्याचे अवैध गुटखा तस्करीचे जाळे पसरले असून संबंधित गाडी न MH 28 BB **25
MH 28 BB**03
MH 28 BB**81 ह्या नंबरच्या बोलेरो पिकअप
MH 12 PQ **03 ह्या खाजगी गाड्या सर्रास अवैध गुटखा वाहतूक करताना दिसतात तसेच त्याचे फेरीवाले सुध्या दिवसा ढवळ्या दोन चाकी वाहनाने गावोगावी फिरून तसेच शहरातील प्रत्येक लहान मोठया किराणा दुकानावर, पान टपरीवर चहाच्या टपरीवर सुध्या सहज ऊपलब्ध होते. तसेच शहरातील पोलीस स्टेशन च्या 200 मीटरच्या आत दवाखाने,शाळा ,महाविद्यालय जवळ सुद्धा सहज मिळते. शाळकरी मुले ह्याच्या आहारी जात आहे त्या मुळे त्याचे आरोग्य धोक्यात येत आहे याला जबाबदार कोण? असा सवाल नागरीक विचारत आहे परंतु स्थानीक पोलीस ह्या कडे अर्थ पूर्ण दुर्लक्ष करत आहेत ? त्याचे कारणं सगळ्याचे मिळून लाखोंचे पॅकेज चालू ?
या प्रकरणी पोस्टेमध्ये काही दिवसापर्वीच एक ट्रान्स पोर्ट ची गाडी गुटख्याचा गाडी देखावा करीता पकडली होती ?
मागच्या वेळी सुध्दा सुजाण नागरिकांनी अवैध गुटखा विक्री चां ट्रक पकडला होता.
सुजाण नागरिक पकडुन देतात मग पोलिस अधिकारी काय फक्त पैश्या पुरतेच मर्यादित आहेत का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे ह्या कडे लोकप्रतिनिधींनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा सर्वत्र मंद स्वरूपात होत आहे.












