
जाहीर सूचना ,जाहीर सूचना, जाहीर सूचना
पावती दाखवा बक्षीस मिळवा!
नगरपरिषद जळगाव जामोद कर विभागामार्फत सर्व
नागरिकांना कळविण्यात येते की सन 2024-25 वर्षातील कर भरणा केलेल्या नागरिकांना पावती दाखवून सदर प्रोत्साहन उपक्रमांतर्गत बक्षीस न.प. कार्यालयामधून मिळेल.
तर कर भरणा बाकी असलेल्या नागरिकांनी कराचा भरणा केल्यास त्यांनादेखील कार्यालयातून सदर भेटवस्तू मिळणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता नप मार्फत भेटवस्तू स्वरूप डस्टबिन देण्यात येणार आहे.
सदर भेटवस्तू प्रथम पावती सादर करणाऱ्या अथवा कर भरणा करणाऱ्या 3000 मालमत्ता धारकांसाठी असेल याची नोंद घ्यावी.













