
जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत दी न्यू ईरा प्राथमिक शाळा प्रथम
जळगाव जामोद :- प्रतिनिधी अमोल भगत
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत स्थानिक दी जळगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, दी .न्यू ईरा प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय परसबाग निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात येते. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तालुकास्तरावरील विजेत्या शाळांचे मूल्यांकन होऊन जिल्हा निर्णय समितीने दिलेल्या निर्णयानुसार दी. न्यू ईरा प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे असे बी. आर.खरात प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.
शाळेच्या परिसरात परसबागेची निर्मिती करण्यात आली असून शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठेच्या संस्कारातून ही परसबाग फुलविली आहे. स्वतः पिकवलेला भाजीपाला व फळे याचे पोषण आहारात समावेश केला जातो ही निर्माण केलेली बाग संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची असून परसबागेमध्ये टोमॅटो, पालक ,मेथी, मुळा, गाजर ,हळद बीट ,वांगे, शेपू ,अद्रक, लसूण, कारले ,पत्ता कोबी ,फुलकोबी मिरची, काशीफळ ,मोहरी, ऊस अळू ,कोथिंबीर ,बटाटा इत्यादी पालेभाज्या व फळभाज्या तसेच पेरू ,जांभूळ ,सिताफळ, आंबा पपई ही फळझाडे तसेच फुलझाडे व शोभिवंत झाडाची आकर्षकपणे लागवड करण्यात आली असून त्यांची निगा राखण्यात येत आहे. परसबाग पाहण्यासाठी पालकवर्ग व परिसरातील शिक्षक बंधूभगिनी यांनी परसबागेला भेट देऊन शाळेचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या परिसरातील परसबाग फुलवण्यासाठी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड साहेब
पंचायत समितीचे शापोआ अधीक्षक दीपक पसरटे शाळेचे मुख्याध्यापक . डी.जे रणीत यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद शहरातील या शाळेने केवळ श्रमप्रतिष्ठेच्या संस्कारातून मुलांना पोषण आहारात सेंद्रिय ताजा भाजीपाला व फळे मिळावी या उदात्त हेतूने तयार केलेल्या परसबागेची जिल्हास्तरावर निवड झाल्याने संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक ,सहसचिव मिलिंद जोशी, प्राचार्य अविनाश कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ आणि पालक वर्ग यांनी कौतुक करून आनंद व्यक्त केला आहे.
(विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक व मानसिक विकास व्हावा तो या देशाचा सुजाण नागरिक घडावा यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची दिलेल्या निकषाप्रमाणे प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या शाळेचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला आहे.परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद देता आला व त्यांच्या आहारामध्ये पौष्टिकता आणता आली या हेतूने आम्ही परसबागेची निर्मिती केली.
-. डी. जे. रणीत
मुख्याध्यापक
दी न्यू ईरा प्राथमिक शाळा जळगाव जामोद













