पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

0
88

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

गेल्या वीस वर्षापासून मतदारसंघात आमुलाग्र बदल झाला आहे.सन २०३४ जळगाव जामोद मतदारसंघ हा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन पोलीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले. पोलीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा निमित्याने बोलले ,
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे ,अप्पर पोलिसांनी अधीक्षक अशोक थोरात , स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नीचळ व्यासपीठावर उपस्थित होते. या पोलीस स्टेशनच्या इमारतीने शतकपूर्ती केली. बदलत्या परिस्थितीमुळे इमारतीत बदल करणे आवश्यक होते. कर्मचारी समाधानी असला पाहिजे तरच तो प्रभावीपणे काम करू शकतो ,त्याकरता भौतिक सुविधा योग्य असणे आवश्यक आहे .करिता पोलीस स्टेशनची दोन मजली भव्य इमारत महाराष्ट्र शासनाकडून उभी राहत असल्याचे आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले .इमारत बांधण्याकरिता जवळपास पावणेचार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे .
तसेच पुढील एक-दोन महिन्यात कर्मचाऱ्यांच्या निवासाठी जवळपास दहा कोटींच्या सदनिका उभारणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक विश्वजीत पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी तर सूत्रसंचालन अनिल भगत यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार बंधू ,गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here