दहा वर्षांनंतर नगर पालिकेच्या हद्द वाढ प्रस्तावाला मिळणार गती

0
60

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

स्थानिक नगरपालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव २०१५ पासून प्रलंबित होता. शहरालगतच्या तेरा खेलींचा समावेश असलेल्या या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून, त्रुटींची पूर्तता केल्यानंतर हद्द वाढ लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. हद्द वाढ झाल्यास नगरपालिका क्षेत्राचे आर्थिक उत्पन्न वाढेल तसेच नागरिकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील.

सध्या नगर पालिका प्रशासकाच्या देखरेखीत आहे.
————————————
हद्द वाढीचा प्रवास

एप्रिल २०१६ : पहिली अधिसूचना जाहीर

जून २०१६ : हरकती व आक्षेप सादर, सुनावणी पार पडली

जून २०१६ : जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर

२०९९ : पहिली अधिसूचना रद्द, सुधारित प्रस्ताव मागवण्यात आला

जून २०२३ : त्रुटी पूर्ततेसाठी आदेश

जून २०२४ : त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
———————————
हद्दवाढीचे फायदे

हद्द‌वाढ झाल्यानंतर नगरपालिकेच्या कर संकलनात मोठी वाढ होईल. यामुळे शहराच्या विकासासाठी शासनाकडून अधिक निधी

मिळण्याची शक्यता आहे. सध्या जळगाव जामोदचे क्षेत्रफळ २.१ वर्ग किलोमीटर असून, हद्दवाढीनंतर ते ७.१ वर्ग किलोमीटर होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २८, २७६ इतकी होती. हद्दवाढीनंतर ती ३५,५०० इतकी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुविधा सुधारण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here