
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
तालुक्यातील पिंपळगांव काळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश मानकर हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव काळे केंद्राचे केंद्रप्रमुख सुधीर ठोंबरे हे होते. त्याचबरोबर शा. व्य. समितीचे उपाध्यक्ष प्रमोद भोपळे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या रुक्मिना बुंदे व . पूजा दांडगे ह्या उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनात एकूण 40 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा समावेश होता. यामध्ये स्वागत गीत, देशभक्तीपर गीते, लावणी, लोकनाट्य, आदिवासी गीत या व अशा सर्व कार्यक्रमांना 12000 रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. त्यामधून सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पैसे न देता दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे पाण्याच्या बॉटल गिफ्ट म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका खडे तसेच शाळेचे शिक्षक रोहनकार सुरडकार, पालवे ,चव्हाण हे सर्व शिक्षक उपस्थित होते.













