मोर्चा केव्हाही धडकू शकतो अशी बातमी प्रसारित होताच महावितरण अभियंता यांनी सुनगाव येथील नागरिकांना दिले लेखी स्वरूपात पत्र

0
37

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

 

जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव येथील गावकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक १९ मे रोजी तहसीलदार जळगाव जामोद व महावितरण अभियंता चौभारेवाला यांना गावाचा विज पुरवठा नेहमी खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत करा याबाबत स्मरणपत्र देण्यात आले.महावितरण विभागाला मागील वर्षी १९ जून २०२४ ला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले होते त्याला ११ महिने झाले त्या निवेदनावर दोन महिन्यापूर्वी गावापर्यंत महावितरणने पोल टाकून त्यावर तारही ओढले परंतु गावचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केलेला नाही.११ महिन्याचा कालावधी उलटूनही गावात विजेचा प्रश्न गंभीर असुन गावाचा विज पुरवठा खंडित झाल्यास सुरू होण्याची शास्वती नसते.गावाला सोळंके नामक लाईनमन असून तो गेल्या चार महिन्यापासून गावकऱ्यांना दिसलाच नाही.सध्या गावचा कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती आहे. मागील वर्षी महावितरण ने एका महिन्यात सुनगाव चा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याचे पत्र दिले होते त्या पत्राला ११ महिने पूर्ण झाले तरीही गावचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. स्मरण पत्राची दखल घेऊन महावितरण ने ७ दिवसाच्या आत गावचा सुरळीत करावा अन्यथा खुट मोर्चा काढु असा इशाराच गावकऱ्यांनी दिला होता परंतु आज सात ते आठ दिवस उलटूनही महावितरणचा येथील विद्युत पुरवठा सुरळीत नाही नेहमी विद्युत दहा-पंधरा मिनिटानंतर बंद चालू होत आहे व कोणत्याच प्रकारच्या उपयोजना केलेल्या नाहीत व गावकऱ्यांना सुद्धा तसे लेखी स्वरूपात कळविले नाही या गावकऱ्याच्या निवेदनाला महावितरणने कोणतीच दखल न घेता केराचीच टोपली दाखविली आहे त्यामुळे सुनगाव येथील जनतेत रोष निर्माण झाला आहे त्यामुळे सुनगाव येथील जनतेचा खूट मोर्चा हा केव्हाही महावितरण कार्यालयावर धडकू शकतो अशी बातमी व प्रसारित होताच काही तासातच महावितरण अभीयंता चौभारेवाल यांनी सुनगाव येथील नागरिकांना उपाययोजना करण्यास दहा दिवसाचा अवधी मागितला व जामोद येथील 33 के वि केंद्रात सांगा साठी स्वतंत्र फिडर बसवून देण्याचे पत्रात सांगितले आहे व हे काम दहा दिवसात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे हे आश्वासन नुसते आश्वासनच राहते का याकडे व विजेचा प्रश्न कायमचा मिटेल का सुनगाव नागरिकांचे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here