पेचप्रसंग ! बदलीला स्थगिती मिळालेले एसपी पानसरे येऊन बसले खुर्चीत… नवीन एसपींच्या येरझारा

0
80

पेचप्रसंग ! बदलीला स्थगिती मिळालेले एसपी पानसरे येऊन बसले खुर्चीत… नवीन एसपींच्या येरझारा

बुलढाणा, अमोल भगत प्रतिनिधी:-

कोणत्या एसपींच्या ऐकावे आणि आता काय करावे? हा मोठा पेच प्रसंग जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांसमोर येऊन पडला आहे. कारण काल सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदलीला स्थगिती मिळालेले एसपी विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन बसले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला. याच खुर्चीवर बसून नवीन एसपी निलेश तांबे यांनी काल मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे श्री तांबे आज सकाळी परेडसाठी पण दाखल झाले होते. इकडे मात्र सकाळीच एस पी पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिला. मागील चार ते पाच दिवसांपासून पानसरे आजारी रजेवर होते. गृह विभागाने त्यांची बदली अमरावती या ठिकाणी करून त्यांच्या जागी तांबे यांची वर्णी लावली होती. परंतु आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत एसपी पानसरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते. काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. तेव्हापासून हीच चर्चा सुरू आहे आता नेमके बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार? तर दुसरीकडे तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यभारी सुरू केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे एसपी नेमके कोण हा प्रश्न जसा पोलीस प्रशासनाला पडलाय तसाच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here