शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रयोग

0
16

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

सुनगाव येथील शेतकऱ्याने केली सफेद मुसली ची लागवड

शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रयोग

 

सफेद मूसली ही अत्यंत गुणकारी व औषध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण घटक असलेली अशी आरोग्यदायी व अनेक उपयोगी असलेली सफेद मुसळी लागवड हे सुनगाव परिसरात केल्या जाते असेच येथील शेतकरी विजय शत्रुघ्न वंडाळे हे आपल्या शेतामध्ये सफेद मूसलीचे मागील 20 वर्षापासून लागवड करीत असतात त्याप्रमाणे आज दिनांक 29 मे रोजी त्यांनी आपल्या शेतात सफेद मूसली ची लागवड केली आहे औषधी वनस्पती सफेद मुसली लागवड
सुनगांव येथील प्रयोगशील अल्पभूधारक शेतकरी विजय वंडाळे व सुनिता विजय वंडाळे यांनी आज सफेद मुसली लागवड करण्यात आली अनेक औषधी गुणधर्म असलेल्या सफेद मुसलीचे वंडाळे कुटुंबिय मागिल विस वर्षापासून लागवड करीत आहेत.प्रतिकुल नैसर्गिक वातावरण व सरकारची शेतकऱ्यांच्या प्रती अनास्था असताना विजय वंडाळे सारखे शेतकरी नेहमी प्रयोग करीत राहतात व मानवी आरोग्यास लाभदायी असलेल्या अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीचे उत्पादन करीत असतात.पुर्णपणे नैसर्गिक देखभाल करून सफेद मुसलीचे उत्पादन करणारे वंडाळे दांपत्य प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रेरनादायी आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here