कृषि रथाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सूनगावात कृषि रथाला प्रतिसाद

0
38

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

केंद्र शासनाच्या कृषी रथयोजनेंतर्गत सुनगाव येथे दिनांक २९ मे रोजी कृषी रथाचे आगमन झाले होते. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध कृषी योजना आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.सराई महादेव मंदिर परिसरात यासाठी विशेष कृषी जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत कार्यरत दिल्ली येथील प्रधान वैज्ञानिक डॉ. अशोक भरीमल्ला आणि मुंबई येथील डॉ. पी.एच. देशमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक संरक्षण, शाश्वत शेती तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी बोर्डे व जाधव, आत्मा योजनेचे सागर राऊत व कृषी सहायक गव्हाणे यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनगावचे कृषिमित्र मोहनसिंग राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here