जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या शिक्षिका लीना घोटेकर तालुक्यात प्रथम…
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय,सुनगाव येथील सहाय्यक शिक्षिका सौ लीना योगीराज घोटेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून वर्ग सहा ते आठ गटात इंग्रजी विषयासाठी उत्कृष्ट व्हिडिओ निर्माण केल्याबद्दल तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं त्यांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे प्रमाणपत्र मानचिन्ह व आठ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आलं तसेच जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल प्रमाणपत्र व ३ हजार रुपये बक्षीस माननीय गटशिक्षणाधिकारी वामन फंड साहेब, दीपक पसरटे व हुरपडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष प्रेमसिंह राजपूत सर, माजी मुख्याध्यापक संजय इंगळे सर, प्रभारी मुख्याध्यापक सोळंके,डिके,अढाव,फोलाने , इंगळे,अतुल पाटील,उमेश पाटील,शुभम कुलट,तेजस बोंबटकार,निखिल धुळे, सुवर्णसिंग राजपूत,रामेश्वर कुनगाडे,विशाल वसूलकार यांनी अभिनंदन केले व त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.