“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण मित्र’ आणि वन विभाग, जळगाव जा. यांचा संयुक्त उपक्रम – पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले”

0
102

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

जळगाव जामोद: दि.५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण मित्र’ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी आणि कृतीशील उपक्रम उत्साहात पार पडला. प्रथम सर्व उपस्थितांना संचालन कर्ते प्रसेनजीत मिस्त्रा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शपथ दिली. त्यानंतर चिमण्यांचे संवर्धनासाठी लाकडी चिमणी घरटे व पक्षांना पाणी पिण्यासाठी पाणीपात्रांचे वाटप करण्यात आले. मंचावर क्षेत्र अधिकारी अतुल बडगुजर साहेब आणि पर्यावरण मित्र रघुनाथ कौलकार सर उपस्थित होते.

यावेळी रघुनाथ कौलकार, अतुल बडगुजर, चतुर्भुज केला, सर्पमित्र शरद जाधव व सुनिल भगत यांनी पर्यावरण दिनानिमित्य मार्गदर्शनपर भाषणे केलीत.

त्यानंतर फॉरेस्ट कार्यालयाचे जळगाव व निमखेडी येथील प्रांगणात वृक्षारोपन केले. तसेच बऱ्हाणपूर रोडवरील जंगलात सर्व विविध बियांची लागवड करून तेथील प्लास्टिक व काचेच्या बाटल्या जमा करून स्वच्छता करण्यात आली. सर्पमिञ शरद जाधव यांनी गावातील पकडुन आणलेला कोब्रा जातीचा साप जंगलात सोडुन देण्यात आला. शेवटी शासकीय आय.टी.आय.मध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात पर्यावरण मित्र राजेश भिवटे, आमले ,डॉ. सतीश शिरेकार, प्रकाश जाधव,बाळू मानकर , सुनील माटे, किसना दातीर यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवीला.

वन विभागाच्या वतीने वनरक्षक वी. पी. गव्हाणे, ए. पी. हिवाळे, धवसे , बारगीर , वनरक्षक रूपाली राऊत , वैशाली जावळे , साखरे , सादिक सुरत्ने, वनरक्षक योगेश गावंडे, सतीश साळवे हे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाने पर्यावरणप्रेम, जनसहभाग, आणि कृतीशीलता यांचा आदर्श निर्माण केला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here