
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
तालुक्यातील खेर्डा येथे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.संतोष धर्माळ सहा.शिक्षक प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गजानन सोनटक्के, प्रा विनोद धर्माळ, प्रा. एन. आर. शहा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आला यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात प्रा.विनोद धर्माळ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापने मागील उद्देश सांगितले.यावेळी महाविद्यालयातील आस्था गावंडे,दिपाली उमरकर, प्रांजली दामोदर,कार्तिक गोंगे तसेच इतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा संतोष धर्माळ यांनी विविध प्रकारचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना आपल्या अंगी सेवाभाव,सचोटी,आत्मनिर्भरता अंगी करायला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख अतिथी पत्रकार गजानन सोनटक्के यांनी विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच समाजसेवा व राष्ट्रसेवा अंगीकारावी असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी नाहिद शहा यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.संतोष धर्माळ कार्यक्रमाधिकारी स्वच्छता किती महत्वाची आहे. हे सांगून संत गाडगे महाराजांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी राजुरकर व वैष्णवी वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन हातेकर याने केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी हातभार लावला.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.संतोष धर्माळ सहा.शिक्षक प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गजानन सोनटक्के, प्रा विनोद धर्माळ, प्रा. एन. आर. शहा उपस्थित होत्या.