
जळगांव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
मुख्यमंत्र्यांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे निवेदन
तालुक्यातील शेतकरी व शिवसेना ( उ. बा. ठा ) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी ( राजस्व ) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. शहर “कोरा करा कोरा करा सातबारा कोरा करा” या प्रचंड घोषणांनी दनानले!
शिवसेनेचा आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.
सविस्तर असे की तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकविमा रखडले २०२३ च्या ढगफुटीचे अनुदान रखडले, फडणवीस सरकारने कर्जमाफीचा दिलेलं आश्वासन पूर्ण होत नाही असं दिसल्यामुळे प्रचंड आक्रोश निर्माण झाला.
त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज 29 सप्टेंबरला स्थानिक दुर्गा चौकातून शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक, उपविभागीय कार्यालयासमोरील छत्रपती संभाजी महाराज चौकात धडकला. मोर्चात अग्रभागी, बैलगाडीवर शिवशाहीचे पदाधिकारी विराजमान होते तर प्रचंड नारे देत कोरा करा कोरा करा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा , हक्काचा पिक विमा मिळालाच पाहिजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र अशा घोषणा देत वाद्यांच्या गजरात मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकल्या नंतर शिवसेना सह संपर्क दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, तालुकाप्रमुख संतोष दांडगे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, शहर प्रमुख रमेश काळे यांची भाषण झाली संचलन विधानसभा संघटक भिमराव पाटील यांनी केले, मोर्चादरम्यान शेतकरी बांधवांनी रखडलेल्या पीक विम्याचे तक्रार अर्ज मोठ्या संख्येने भरून दिले ते अर्ज उपविभागीय कार्यालयात दिली, त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्यासह कृषी अधिकारी माननीय तहसीलदार निवेदनाला समोर गेले व मागण्या ऐकून घेत निवेदन स्वीकारले, काही मागण्यावर चर्चा झाली तर काही मागण्या त्वरित मान्य करण्याचे मान्य केले. सदर निवेदनावर एकूण चार मागण्या होत्या त्यापैकी २०२२ ढकफुटीचे अनुदान व 2023 चा रखडलेला पिक विमा त्वरित वितरित करण्याच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. या मोर्चामध्ये दत्ता पाटील शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख, शुभम पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख, तुकाराम काळपांडे उपजिल्हा प्रमुख, मुश्ताक भाईजान अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख, विशाल पाटील युवा सेना उपजिल्हा प्रमुख, संकेत रहाटे युवा सेना, भीमराव पाटील विधानसभा संघटक, रमेश ताडे शहर प्रमुख, चांद कुरेशी उपशहर प्रमुख, संतोष डब्बे शहर संघटक, सुधीर पारवे तालूका प्रसिद्धी प्रमुख, विशाल ताकोते मा. युवा सेना तालुका प्रमुख, कैलाससिंह राजपूत उपतालुका प्रमुख, शेख अनिस युवा सेना शहर प्रमुख, गजानन मांडेकर, अत्ताउल्ला खान, विजयसिह सोळंके, संजय दंडे, कार्तिक राऊत, या सह असंख्य शेतकरी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते या मोर्चा चे आयोजन तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले.
उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन देतांना उबाठा जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख संतोष दांडगे व पदाधिकारी, कार्यकर्ते.