
पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसापासून बंद
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत मधील कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले असेच चित्र पाटील लेआउट मध्ये निदर्शनास आले आहे. पाटील लेआऊट मध्ये ग्रामपंचायतचे नाली खोदकाम व बांधकाम चालू आहे. परंतु या नाली खोद कामामुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ही तुटलेली असल्याने त्यामुळे या परिसरात दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. असे असताना सुद्धा अद्यापही ती पाईपलाईन नादुरुस्तच आहे.
ग्रामपंचायतने संपूर्णपणे आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले आहे जसे धूळ फवारणी व पिण्याचे योग्य स्वच्छ पाणी सूनगाव ग्रामपंचायत ला 140 गाव पाणीपुरवठा योजना ही नावापूर्तीच असून वास्तविक या योजनेचे पाणी सुनगाव ग्रामपंचायत कडून नागरिकांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. विहिरीचे बोरचे पाणी एकत्रित करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे परिसरात किडनीचे आजार व रोग व इतरही आजार होण्याची शक्यता आहे व तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी सुनगाव येथील नागरिकांची मागणी आहे.