सूनगाव येथील स्मशानभूमीची दुरावस्था

0
28

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असताना सुनगाव ग्रामपंचायतचे स्मशानभूमी येथील झालेली दुरावस्था बघता याकडे ग्रामपंचायत सुनगाव प्रशासनाने येथे परिपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसते आहे. असेच चित्र सुनगाव ते जामोद रोडवरील स्मशान भूमीचे झालेले दिसत आहे.

शासनाचा निधी असताना या स्मशानभूमीचे झालेली दुरवस्था ही निंदनीय आहे या स्मशानभूमी खानी नदी जवळील स्मशानभूमीचे टीन पत्रे हे तुटलेले उडालेले दोन ते तीन वर्षापासून या अवस्थेत आहे.

त्यामुळे सुनगाव येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी येथे ऊन वारा पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. या स्मशानभूमीची दुरावस्था पाहता यावर एकही टिन पत्रा हा व्यवस्थित राहिलेला नाही याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे यावरून सुनगाव ग्रामपंचायत हे नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडत आहे.

तरी या स्मशानभूमीची दुरुस्ती हे तात्काळ सूनगाव ग्रामपंचायत ने करावी अशी सूनगाव येथील नागरिकांची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here