भारत संचार निगम लिमिटेड बुलढाणा स्थित खामगाव दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयात पंचविसावा दूरसंचार वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

0
71

 

खामगाव प्रतिनिधी:-

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल देशभरात 25 वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तसेच बुलढाणा दूर संचार जिल्हा प्रबंधक कार्यालयात आज दिनांक 01/10/2025 रोजी जिल्ह्याचे सहाय्यक प्रबंधक एन आर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी प्रभुणे मुख्याध्यापक शासकीय तंत्रनिकेतन खामगाव तसेच इसोकार प्रबंधक खिल्लारे उपविभागीय अभियंता मोसिन, राजगुरे यांच्या उपस्थित केक कापून साजरा करण्यात आला.
मागील आठवड्यापासून जिल्हा दूरसंचार विभागामार्फत विविध कला स्पर्धा निबंध कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते त्यात बक्षीस वितरण विविध स्पर्धकांना देऊन गौरव करण्यात आला मागील आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात स्वदेशी तंत्रज्ञान बनविलेले फोरजी चार लाख टावर चा शुभ हस्ते समारंभ करण्यात आला हे विशेष आज बीएसएनएलचे कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जाळे पसरले असून देशात एकमेव सरकारी दुरसंचार कंपनी असून आज शहरी व ग्रामीण भागात सेवा देण्यात तत्प्रार असून तोट्यात जरी आहे स्पर्धेच्या युगात भक्कम टिकून आहे जनतेच्या सेवेसाठी विश्वासामुळे आज बीएसएनएल 25 वे वर्षे वर्धापन दिन साजरा करण्यात आहे याचे सर्व श्रेय फक्त देशाच्या जनतेला समर्पित आहे आज खामगाव शहरात वर्धापन दिनानिमित्त रॅली काढून सर्व जिल्हाभरातील कर्मचारी सेवा नियुक्त कर्मचारी जिल्ह्यातील मोबाईल सिम कार्ड विक्रेते. टीआयपी व कंत्राटि वर्कर बीएसएनएल युनियन पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता पांडव इंगळे,दिघोळे, रणधीर गायकी मानकर,विजय कांबळे,नकुल कुलकर्णी,नेमाने, केवल पाटील, वांजोळ,चितोडे,तेलकर,गजानन झाल्टे, अजय पवार,बापू सुधाकर जाधव यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here