दि. 19/10/23 रोज गुरुवारला वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचीव विजय सातव सर यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणासमवेत सुमारे 3500 सह्यांचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले. निवेदनात कंत्राटी नोकरभरती व सरकारी शाळांच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात सरकारला निवेदन देण्यात आले. जर सरकारने यावर सकारात्मक विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला.निवेदन देतेवेळी सातव सरांसोबत अनेक वंचितचे कार्यकर्ते तथा कॉलेजचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश होता.