
खामगाव:- मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ खामगाव शहरातील सकाल मराठा समाज बांधवानी २९ ऑक्टोबर २०२३ पासून टॉवर चौक येथे आमरण व साखळी उपोषण सुरु केले ३१ ऑक्टोबर २०२३ हिंगणा कारेगाव येथील सरपंच सौ. राजकुमारी तेजेंद्रसिंह चौहान यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. राज्य सरकारने विशेष अधिवेशन तातडीने मराठा आरक्षणाचा ठराव पारित करावा व केंद्र सरकार कडून संसदेत समंत करून घ्यावा अशी मागणी केली.













