अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीचा वाढीव मोबदला- आ.डॉ.संजय कुटे

0
156

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित.

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :-

दि. २२ जुलै २०२३ जळगाव जामोद तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मदतीचा निकषानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार २ हेक्टर पर्यंतच मदत देय होती व खरडून गेलेली शेती आणि पिकांचे नुकसान यापैकी एकच मदत देय होती. २ हेक्टरच्या मर्यादेमुळे दोन्ही तालुक्यातील जास्त जमीन धारणा असणारे ३००० पेक्षा जास्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार होते, हि बाब आ.कुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ह्या तृटी दूर करणे अत्यंत आवश्यक होते अन्यथा लाखो शेतकरी कोटींच्या मदतीपासून वंचित राहिले असते.

आजच्या शासन निर्णयानुसार विदर्भातील शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार आहे त्यानुसार आज दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय सीएलएस-२०२३/प्र.क्र.१६८/म-३ नुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर शेतकरी बांधवांना मदत करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी असा डॉ.कुटे यांचा प्रयत्न होता परंतु आज निघालेल्या शासन निर्णयामुळे मदत मिळण्यासाठी थोडा उशीर होईल परंतु विदर्भातील लाखो शेतकऱ्यांचे ३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील तरतुदीमुळे होणारे नुकसान टाळून शेतकऱ्यांना या शासन निर्णयामुळे भरघोस मदत मिळणार आहे.

याबाबत सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत तत्काळ सादर करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ८ महसूल मंडळातील अग्रिम पीकविमा मंजूर करण्यात आलेला आहे या पिकविम्याच्या अनुदानाची रक्कम दिवाळीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे थेट जमा करण्याचा प्रयत्न असणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार असून शेतकरी बांधवांनी या मदतीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या व अफवा पसरविणाऱ्या शेतकरी विरोधी प्रवृत्तीला कुठेही थारा देऊ नये.

आपल्या शहरातील/तालुक्यातील ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्याकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

जळगांव जामोद

https://chat.whatsapp.com/Jdvk9wK6Bun2JFW2yIoirz

संग्रामपूर

https://chat.whatsapp.com/L5xlE8C3NIW1q5Bw153dSc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here