सूनगाव येथील युवा उद्योजक आशीषसिंह राजपूत यांना आचार्य पदवी प्रदान

0
230

 

जळगाव जामोद(प्रतिनिधी):-

स्वतःच्या जिद्द आणि मेहनतीच्या भरवश्यावर असाध्य ते साध्य केल्याची शेकडो उदाहरणे असून त्यातील एक म्हणजे जळगांव जा तालुक्यातील सूनगाव येथील आशीषसिंह गोविंदसिंह राजपूत.
ग्रामीण भागातील सूनगाव येथे आशिषसिंह यांचा जन्म झाला असून स्वतः बुद्धिमत्तेची चमक त्यानी शालेय जीवनापासूनच जाणवत होती,जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात होऊन उच्च प्राथमिक शिक्षण मातोश्री नाथीयाबाई विद्यालय येथे पूर्ण केले.तल्लख बुद्धिमत्ता व अफाट जिद्द असलेल्या आशिष सिंह यांनी कॉस्मेटिक मध्ये एम.टेक.चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यानी कुठलीही खाजगी, सरकारी नोकरी न स्विकारता स्वतः व्यवसाय सुरू केला.हर्बल एक्सट्रॅक्ट निर्मितीमध्ये त्यांनी अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करून हिमाचल प्रदेश व हरियाणा येथे त्यांचा यशस्वी नावारूपास आला आहे.गतवर्षी त्याना युवा उद्योजक पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.उद्योग क्षेत्रात त्यानी जरी नावलौकिक प्राप्त केला असला तरी त्यानी आपले पुढील शिक्षण सुरूच ठेवले होते व नुकतीच त्याना दिल्ली येथे बिजनेस मॅनजमेंट या विषयात आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे.
सूनगाव ग्रामीण भागातून आशीषसिंह राजपूत यांनी घेतलेली गरुडझेप निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here