
जळगांव जामोद (प्रतिनिधी):-
तालुक्यातील सूनगाव येथील प्रमोद सखाराम अंबडकार यांची चित्रपट सृष्टीत धडाकेबाज एन्ट्री झाली असून त्यानी लिहिलेले गीत नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
रांगडा या मराठी चित्रपटासाठी त्यांनी लीहिलेले’जीवाचा मैतर’हे गीत प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायिले आहे.सदर गीत नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्याला अल्पावधीतच भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. जळगांव जा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ .संजय कुटे यांनी नुकतेच गाण्याचे प्रमोशन केले आहे.अगोदर सुद्धा अंबडकार यांनी हेल टू हेवन या शॉर्ट हिंदी फिल्म मध्ये गीत लिहिले होते.माया गावचे पाणी हा कविता संग्रह सुद्धा लोकप्रिय झाला होता.सत्यवान सावित्री,घेतला वसा टाकू नको या मालिकांसाठी सुद्धा त्यानी या अगोदर गीते लिहिली आहेत.कलर्स मराठीवरील’सुंदरा मनामध्ये भरली व योग योगेश्वर जय शंकर या मालिकेसह झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा त्यांनी अभिनय केला आहे.
स्वतः एक इंजिनिअर असून कविता,गीत लिखाण विषयात त्याना विशेष आवड असून सूनगाव सारख्या छोट्या गावातून त्यांची चित्रपट सृष्टीत पर्यन्त ची एन्ट्री निश्चितच खूप प्रेरणादायी आहे.













