
रात्री काही काळ तणाव वाढला होता पोलीसाच्या सतर्कते मुळे पुढील अनर्थ टळला
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
रात्री एका मुलाने इन्स्टाग्राम वर स्टोरी स्टेटस ठेऊन छ शिवाजी महाराज च्या विटंबना होईल तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशे कृत्य केल्याने आरोपी वर गुन्हा दाखल होऊन आरोपी ला अटक करण्यात आली.
काल दिनांक 20 /11/23 चे 8 वा दरम्यान आरोपी शेख अबीद शेख शाफिक रा सुलतान पुरा याने छत्रपती शिवाजी महाराज यांना आई भवानी तलवार देत असलेल्या फोटोला एडिट करून छत्रपती शिवाजी महाराज हे टिपू सुलतान यांच्या समोर गुघडे टेकून दोन्ही हात समोर करून आपल्या mad -max-302 या इंस्टाग्राम स्टोरीचे स्टेटस ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होईल व दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने इंस्टाग्राम स्टोरी चे स्टेटस ठेवला आहे त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहे अशा तोंडी तक्रारी वरून अप न 623/23 कलाम 295 अ भा द वी नुसार रात्री 20 /11/23 चे रात्री 10 वाजता रितेश नारायण डोबे रा जळगाव जामोद यांचा तक्रारीवरून दाखल करण्यात आला आरोपी शेख आबीद याचे वय 17 वर्ष 7 महिने 20 दिवस असल्याने त्यास बुलढाणा येथे पाठवण्यात आले
रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता काही संतापलेल्या युवकांनी” बंद करो बंद करो”चौका चौकात जाऊन काही वेळात बाजार पेठ बंद झाली परंतु शहरात पोलिसांची गस्त फिरल्याने पुढील अनर्थ टळला आज शहरात सर्वत्र शांतपणे सर्व व्यवहार सुरू होते













