
जळगाव जामोद(प्रतिनिधी):-
स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य अभ्यास मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यामाने उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश मायी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक माननीय श्री एन एस पाटील साहेब , रोखठोक वृत्तपत्राचे संपादक व पी.आर.एम. इंडस्ट्रीजचे संचालक राजेश लहासे साहेब व मिटकॉनचे समन्वयक खराटे तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ऋषिकेश विप्रदास , प्रा. भोपळे मॕडम हे उपस्थिती होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन करून झाले. प्रास्ताविक करताना मिटकॉनचे समन्वयक खारटे यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाचे महत्त्व तसेच उद्योगाची माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक श्री राजेश लहासे यांनी विविध उद्योग त्यांना लागणारे भांडवल, त्यासाठी लागणारे कागदपत्र व पात्रता कमी भांडवल लागणारे उद्योग याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रमातील योजना, शासनाचे अनुदान, कर्ज योजना, अनुदान व नवीन उपक्रमाची माहिती सविस्तरपणे दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी उद्योगाचे महत्त्व सांगून स्वयंरोजगारातून आपण सुध्दा इतरांना रोजगार देवू शकतो असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद बावस्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक ऋषिकेश विप्रदास यांनी केले. कार्यक्रमास 200 विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी प्रा भोपळे मॕडम, प्रा. बावस्कर, हर्षद धर्मे, गजानन वानखेडे, समाधान नीलजे हे उपस्थित होते.













